🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२च्या साखळी सामन्यानंतर आता प्लेऑफ आणि फायनलचा सामना कुठे खेळवला जाणार, याबाबत माहिती समोर आली आहे. लखनऊ आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफ आणि अंतिम सामने खेळवले जाण्याची दाट शक्यता आहे. साखळी सामने महाराष्ट्रातील चार स्टेडियमवर खेळवले जात आहेत.
मे महिन्यात होणाऱ्या प्लेऑफ सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी दोन नवीन ठिकाणांवर सोपवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी असे समजले होते की अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम प्लेऑफ सामन्यांचे आयोजन करेल, परंतु ताज्या अहवालांनुसार, लखनऊचा या यादीत समावेश झाला आहे. सध्या याबाबत अंतिम निश्चितीची प्रतीक्षा आहे.
या मोसमात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ असल्याने या दोन्ही शहरांना प्लेऑफच्या सामन्यांचे आयोजन करण्याचे अधिकार मिळू शकतात, असे सूत्रांचे मत आहे. लखनऊमध्ये पहिला क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामना असू शकतो. तर दुसरा क्वालिफायर आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसली तरी सध्याच्या मैदानाव्यतिरिक्त अन्य मैदानांचा वापर प्लेऑफसाठी केला जाणार असल्याचे निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले
- “गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
- “भाजप केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही तर…” ; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
- VIDEO : “आजही तुझ्या चेहऱ्यावर…”, रॉस टेलरच्या निवृत्तीवर विराट काय म्हणाला माहितीये?
- IPL 2022: ‘पॉवर हिटिंगची क्षमता असूनही…’ बॅक टू बॅक दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन केन संतापला!
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
