औरंगाबाद : प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन ओळख असलेल्या पुरातन नागघाटवरुन वाळुची चोरी करुन वाहतुक करणाऱ्या सात दूचाकी पैठण पोलिसांनी जप्त केल्या आहे.
सोमवारी दि.५ पहाटेच्या सुमारास पो.नि.किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली.
सोमवारी सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान नागघाट नदीपात्र व शहागड कमानी जवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
यावेळी पोलीस आल्याचे चाहूल लागता वाळूचोर दुचाकी सोडून फरार झाले. पोलीस ठाण्यात मोटरसायकल मालक-चालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.किशोर पवार, सपोनि गजानन जाधव, उपनिरीक्षक सागडे, गिराशे आदींनी पार पाडली.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रणव मुखर्जींचे पुत्र ‘तृणमूल’मध्ये
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

