Share

पुण्यात ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, रुपाली चाकणकर पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच आरक्षण बचावाची भूमिका घेत ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले आहेत. विविध संघटनांच्या सहभाग असलेला ओबीसींचा मोर्चा बुधवार, ता.२ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे. यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांनी पुढाकार घेतला आहे.

ओबीसी आरक्षणावर भविष्यात येणारे गंडातर लक्षात घेता ओबीसी समुदायाने वेळीच जागे होणे आवश्यक असल्याचे समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी जिल्ह्यातील अखिल भारतीय महात्मा फुले परिषद आणि अन्य ओबीसी संघटनांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता.

ओबीसी बचाव मोर्चात सहभागी झालेल्या महिला-पुरुष, युवक-युवतींनी आरक्षण बचावाबाबत दिलेल्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणानला होता. हाता फलक घेवून घोषणाबाजी करीत मोर्चाला बस स्थानकापुढील स्वराज्य भवनातून सुरुवात झाली. ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, ‘ओबीसी जनगणना झालीच पाहिजे’, ‘आरक्षणाच्या हक्का खातर ओबीसी उरतली रस्त्यावर’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ आदी घोषणा व हाता फलक घेवून हजारो ओबीसी महिली व पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते.

या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार समीर भुजबळ हे करत आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर या देखील या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. परवानगी नसताना मोर्चाचे नेतृत्व करत असलेले माजी खासदार समीर भुजबळ मोर्चा काढण्यावर ठाम होते. मात्र पोलिसांनी समीर भुजबळ यांच्यासह आंदोलांना अटक केली आहे. तर रुपाली चाकणकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!