Share

धनंजय मुंडे म्हणाले विजय आमचाचं; प्रीतम मुंडे म्हणतात गुलाल आमचाचं!

Published On: 

🕒 1 min read

बीड:- विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज मतदान होतं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. विधानपरिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे व भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी पिंपळगाव येथे मतदान केले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे व प्रीतम मुंडे यांनी मतदारांचा प्रतिसाद पाहता कौल आमच्याच बाजूने लागेल, विजय आमचाच होईल, असा दावा दोघांनी केला आहे.

पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. कोरोनाच्या काळामध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो, याबद्दल शंका होती. मात्र मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. गुलाल आमचाच असेल, असा विश्वास खासदार प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला, तर बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांनी निवडणूक लढल्यामुळे त्याचा निश्चितच परिणाम होईल, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकदाच केंद्रावर मतदान केले आहे. सतीश चव्हाण पदवीधर मतदारसंघात हॅट्ट्रिक साधतील, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. त्यांनी आज परळी येथील पिंपळगाव येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, मतदानापूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे या आयसोलेट (विलगीकरण) झाल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा ट्विट करत कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

 महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!