Share

पुणे : भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड यांच्यातच प्रमुख लढत

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे.आज या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.

याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्यात प्रमुख लढत हाेणार असल्याचे दिसून येत आहे. लाड यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसशी बंडखाेरी करुन निवडणुक लढवली हाेती परंतु यावेळी त्यांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्याने निवडून येण्याची कसरत त्यांना पार करावी लागणार आहे.

मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत काेकाटे हे सुध्दा निवडणुकीच्या रिंगणात असून ते कशाप्रकारे लढत देतात हे बाब ही पाहण्यासारखी आहे. शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार प्रा.जयंत आसगांकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांच्यात दुरंगी लढत महत्वपूर्ण ठरणार आहे. शिक्षक मतदारसंघात मागील वेळी पराभूत झालेली जागा परत मिळविण्याकरिता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आग्राही असून निवडणुकीच्या निकालानंतर हे चित्र स्पष्ट हाेऊ शकेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!