Share

सहा महिन्यांचे राशन घेऊन आलोय, आता मागे हटणार नाही; द ग्रेट खली आक्रमक!

Published On: 

नवी दिल्ली:- मी माझ्यासोबत सहा महिन्यांचे अन्नधान्य आणले आहे. केंद्र सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही, अशी रोखठोक भूमिका WWE च्या रिंगणात मातब्बर पहिलवाणांना धूळ चारणारा द ग्रेट खलीने मांडली आहे. द ग्रेट खली आता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे. खलीने काल दिल्ली सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. केंद्र सरकारने कृषी कायद्यासह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी खलीने केली आहे.

शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने अन्नधान्य विकत घेतलं जात आणि सर्वसामान्य नागरिकांना ते २०० रुपयांमध्ये विकले जाते. त्यामुळे सर्वसामान्य गरीब, होतकरु मजुरांचे प्रचंड नुकसान होते. सर्वांनी शेतकऱ्यांसोबत उभं राहावं, जेणेकरुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मजबूर होईल, अशी विनंती खलीने केली आहे.

खलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो शेतकऱ्यांचा समस्या मांडत आहे. सरकारची गाठ आता पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत आहे. मी सहा महिन्यांचं राशन सोबत घेऊन आलो आहे. त्यामुळे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथेच ठाण मांडून राहणार, असा इशारा खलीने दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!