Share

चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

Published On: 

औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील कोरडगाव येथील शेतकऱ्याच्या शेतातील चंदनाची झाडे चोरी प्रकरणी दोन दिवस उलटूनही अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ करीत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. ही घटना कोरडगाव शिवारातील आदीनाथ सखाहरी मदने या शेतकऱ्याच्या शेतातील ३४५ चंदनाची झाडे चोरट्यांनी चोरून नेल्याचे मदने यांचे म्हणणे आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती.

निमगोंदगाव येथील शेतकरी आदीनाथ सखाहरी मदने हे औरंगाबाद शहरामध्ये वास्तव्याला आहे. त्यांची कोरडगाव येथे गट नंबर ८२ मध्ये तीन एकर शेती आहे.त्यांनी २०१६ मध्ये त्यांच्या शेतात  ३४५ चंदनाची झाडे लावली होती. पाच वर्षांपासून या झाडांची देखभाल केली यासाठी त्यांचे लाखो रुपयांचा खर्च झाला. ही झाडे चोरट्यांनी कापून नेल्याने मदने यांचे जवळपास २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणणे आहे.

मात्र वनविभाग व पोलीसांनी या घटनेची दखल घेतली नसून . त्यामुळे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. ही झाडे चोरून नेल्याची मदने यांची तक्रार असली तरी प्रत्यक्षात ही झाडे कापलेल्या अवस्थेत शेतात पडून आहेत.त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याने अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस व वनविभागाचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!