औरंगाबाद : कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आणि संचारबंदी करण्यात आली आहेत असे असतानाही लोक याला गांभीर्याने पाहत नाही. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतोय आणि पोलिसांनी केलेला हा लाठीचार्ज योग्यच असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
हा विषाणू भयानक आहे आणि याचे गांभीर्य प्रत्येकाने घ्यायला पाहिजेत. आपल्या जिवापेक्षा दुसरी कोणती गोष्ट महत्त्वाची नाही त्यामुळे बाहेर फिरू नका. इतरांनाही फिरू देऊ नका. पोलिसांनी दोन दिवसापासून बाहेर फिरणाऱ्या वर लाठीचार्ज करत आहे.
सरकार तर्फे वेळोवेळी विनंत्या करूनही जनता ऐकत नसल्यामुळेच नाईलाजास्तव पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतोय आणि त्यामुळेच संचारबंदी करावी लागली आहे.त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घ्या घराबाहेर पडू नका आपल्या ही काळजी घ्या असे आवाहनही खासदार इम्तियाज जलील यांनी केले व पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज चे समर्थन केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

