🕒 1 min read
औरंगाबाद : रेल्वे बोर्डाच्या परीक्षेसाठी वाहतूक साधन न मिळाल्याने गोंधळून गेलेल्या विद्यार्थिनीला सुखरूप परीक्षा केंद्रा पर्यंत पोहचविणाऱ्या पोलिसांवर गृहमंत्र्यांनी शाबासकीची थाप दिली. त्यानंतर दुपारी बस स्थानक परिसरात कावऱ्या बावऱ्या झालेल्या दोन अल्पवयीन मुलींना वाहतूक पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांकडे सुख रूप सोपविले. त्यामुळे शहराच्या शिरपेचात सक्षम पोलिसांमुळे, कडक लॉकडाऊन मध्येही मनाचा तुरा रोवला आहे.
शनिवारी (१३ जानेवारी) दुपारी एक ते दिड वाजेच्या दरम्यान लॉकडाऊन असताना दोन अल्पवयीन मुली या एकमेकींचा हात धरून, सिबीएस बस स्थानकाच्या समोर उभ्या होत्या. यामुलींचे वय दहा ते बारा वर्षाचेच असावे. कावऱ्या बावऱ्या झालेलया या मुलीच्या मनात कुठे जायचं? असा प्रश्न असावा. या मुलींची अस्वस्थता वाहतूक पोलिस विभागाचे कर्मचारी कृष्णा एस मोरे आणि एएसआय अशोक आर साळवे यांनी ओळखली.
त्यांनी मुलींना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली. या दोन्ही मुली रागाच्या भरात घराबाहेर पडल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी या मुलींच्या पालकांशी संपर्क केला. त्यांना सुखरूप त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केले. वाहतूक पोलिस कृष्णा मोरे आणि एएसआय साळवे यांनी या मुलींकडे लक्ष दिले नसते. तर या दोन्ही मुलीसोबत काय घडले असते? याची कल्पना न केलेली बरी. आपले कर्तव्य बजावत असताना, या अल्पवयीन मुलींचे आयुष्य कृष्णा मोरे आणि एएसआय अशोक साळवे यांच्या सतर्कतेमुळे वाचले.
यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गातून दोन्ही वाहतूक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संपूर्ण महाराष्ट्र पोलीस कोरोनाच्या लढाईला सामोरे जात असताना. औरंगाबाद पोलीस मात्र, याही लढाईत आपली माणुसकी जपत असल्याचे या दोन घटनांमधून समोर आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

