Share

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने निराश महिला क्रिकेटपटुला सीएसकेने दिली ही ‘भेट’

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा रद्द केली.

आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर अनेक क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू केट क्रॉस ही देखील आयपीएलची खुप मोठी चाहती आहे. केट आयपीएलमध्ये सीएसकेला सपोर्ट करत असते. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यानंतर तिनेही ट्विट करुन नाराजी जाहिर केली होती. मात्र तिने या निर्णयाचे स्वागत करत खेळाडुंच्या सुरक्षेला प्राधान्या दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या ट्विटनंतर सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने केटला सीएसकेची तिचे नाव असलेली एक जर्सी ‘भेट’ म्हणुन पाठवली.

https://twitter.com/katecross16/status/1389562068093882374

सीएसकेने पाठवलेली भेट बघताच केट खुप खुश झाली. केटने या जर्सीत एक फोटो ट्विटरवर पोस्ट करत सीएसकेच्या संघाचे आभार मानले आहे. आणि स्पर्धा पुन्हा सुरु झाल्यावर मी सपोर्ट करायला मी तयार असणार हे पण सांगितले. केटने इंग्लंडच्य महिला संघाकडून आतापर्यंत ३ कसोटी, २८ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळली आहे. तर केटने कसोटीत १४, एकदिवसीय सामन्यात ३५ आणि टी-२० सामन्यात ११ गडी बाद केले आहे

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!