Share

‘पोलीस ममतांच्या कार्यकर्त्यांना भीत आहेत’, राज्यपालांचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान हिंसाचार झालेल्या कुचबिहार जिल्ह्याचा दौरा करण्याचे राज्यपाल जगदीप धनकर यांनी ठरवले होते. यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. ‘तुम्ही कुचबिहार दौरा एकतर्फी पद्धतीने आखल्याचे मला सोशल मिडीयावरून कळले. गेली कित्येक दशके अस्तित्वात असलेल्या शिष्टाचारांचा यामुळे भंग झाल्याचा मला खेद होतो. असे अचानक दौरे आखण्याचे निर्णय घेण्यापासून तुम्ही परावृत्त व्हावे’ असे ममता म्हणाल्या होत्या.

तरीही राज्यपाल जगदीप धनकर यांनी कूचबिहार भागाला भेट दिली. त्यानंतर आज राज्यपालांनी पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेली परिस्थिती सांगताना राज्य सरकारवर निशाणा साधला. “राज्यातले नागरिक पोलिसांकडे जायला घाबरत आहेत. पोलीस तृणमूलच्या कार्यकर्त्यांना घाबरत आहेत. मी पोलिसांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. मी त्यांना सांगितलं आहे की त्यांच्यासाठी मी छातीवर गोळी खाईन”, असे राज्यपाल धनकर म्हणालेत.

यावेळी धनकर यांनी मुख्यमंत्र्यांनी वाद टाळायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “राज्यातल्या परिस्थितीवर मी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक दृष्टीकोनातून बोलणार आहे. त्यांना जनतेचा कौल मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट वाद टाळायला हवा”, असे राज्यपाल म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!