🕒 1 min read
मुंबई : कोरोना संकटात आतापर्यंत देशात अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. याच दरम्यान, भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत ‘कोरोना व्हायरसही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे’, असे त्रिवेंद्र सिंह रावत म्हणतात.
‘दर्शनी पाहता करोना विषाणूही एक जीव आहे, इतरांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु, आपण मनुष्य स्वत:ला सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो आणि त्याला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तो स्वत:च रुप बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्याला सुरक्षित राहण्यासाठी विषाणूला मागे टाकण्याची गरज आहे’ असं वक्तव्य त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले.
दरम्यान यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्यावरुन संताप व्यक्त केला आहे. ‘हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात?,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी त्रिवेंद्र रावत यांचा व्हिडिओही शेअर केला आहे.
हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र रावत. काय तारे तोडतायत ऐका. कुठून हे नग मिळतात? pic.twitter.com/cgjakNRkfS
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 14, 2021
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. यात माजी मुख्यमंत्र्यांना ट्रोलही केलं जातंय. ‘आपला देश आज जगातील सर्वात कठीण परिस्थितीतून का जात असेल, हे एव्हाना कळलंच असेल’ तसंच ‘या विषाणूच्या जीवाला सेंट्रल विस्टामध्ये आश्रय दिला गेला पाहिजे’, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत
- १८ वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का? आता शिक्षक करणार सर्वेक्षण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

