🕒 1 min read
पुणे : पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यात ४४ ऑक्सिजन जनरेशन प्लांट प्रस्तावित आहेत. यापैकी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येकी २ असे एकूण ४ ऑक्सिजन जनरेशन प्लांट सुरू झाले आहेत. अन्य ऑक्सिजन जनरेशन प्लांट देखील लवकरात लवकर सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत,’ अशा सूचना त्यांनी दिल्या.
कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने ४५ वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील आहे. परंतू सध्या मर्यादित स्वरुपात लस उपलब्ध होत आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, बैठकीनंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला शालेतून जोडे लगावले. देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाला चिमटा काढला.
कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. त्यावरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. नागरिकांमधून त्याबद्दल नाराजी असल्याचे सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की, ‘जाऊ द्या आता त्याला काय… पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही फोटो असतो. आता करणार काय? तिथे फोटो याच्यासाठी असेल की, शंभर रुपये लिटरने तुम्ही पेट्रोल भरताहेत, तर त्यांच्या साक्षीने आपण भरतोय. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेत. पण त्याची पब्लिसिटी किती करावी? आम्ही प्रमाणपत्र देताना कुणाचेही फोटो.. तसलं काही नाही केलेलं. माणसांना यातून कसं बाहेर काढता येईल, असा विचार केला पाहिजे,’ असे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत
- १८ वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का? आता शिक्षक करणार सर्वेक्षण
- सोशल मीडियावर ओळखीनंतर तरूणीवर अत्याचार! पीडितेची दोन लाख रूपयांची फसवणूक
- शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू, बांधकामाच्या ठिकाणी भिंतीचे प्लास्टर करताना घडली घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

