Share

‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात देशाची पार वाताहात झाली आहे. केंद्र सरकार कोरोनाच्या संकटाला सामोरे जाण्यास अपयशी ठरले आहे. देश सध्या रामभरोसे असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. देशात सरकार, प्रशासन, पंतप्रधान, आरोग्यमंत्री आहेत. पण ज्याप्रकारे मृत्यू आहेत, गंगा नदीत हजारोंच्या संख्येने मृतदेह मिळत आहेत, हाहाकार माजला आहे ते पाहता देश रामभरोसे आहे. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतही परिस्थिती वाईट आहे. तिथेही ऑक्सिजनअभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण बाजूला ठेवून जर चर्चा केली तर देशातील परिस्थिती सुधारु शकते असा सल्ला राऊतांनी दिला होती.

यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलेय.. ‘राऊतजी एवढे अगतिक का? घरबसल्या आभासी कारभार करणाऱ्या उद्धव ठाकरे नेतृत्वाखालील सरकारला असे आडून टोमणे मारणे त्यांच्यातील राजकारण्याला शोभत असले, तरी त्यांनी आपल्यातील पत्रकाराला जाब विचारला पाहिजे. राज्याचा आंधळा कारभार पाहण्याएवढा डोळसपणा त्यांच्यातील पत्रकाराने तरी दाखविला पाहिजे.

राऊतसाहेब, डोळे उघडा… देशात कोरोनाचा हाहाःकार उडाला त्यात सर्वाधिक महाराष्ट्राचा वाटा आहे हे कस विसरून चालेल? या कठिण परिस्थितीत जनतेला मदत करण्याऐवजी मंत्री अधिकाऱ्यावरून भांडत आहेत, पीआर कंत्राट दिली जात आहेत… किती यादी सांगू?,” असं म्हणत उपाध्ये यांनी राऊतांना सवाल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!