🕒 1 min read
मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस'(International Human Rights Day) म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी ट्विट करत जागतिक मानवी हक्क दिनी प्रत्येकाच्या मूलभूत हक्कांचा सन्मान राखत एकत्रितपणे प्रागतिक वाटचाल करण्यास कटिबद्ध राहूया, असे आवाहन केले आहे.
यासंदर्भात ट्विट करत पवार म्हणाले आहेत की,’भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय हे मूलभूत अधिकार दिले आहेत. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक आहे. जागतिक मानवी हक्क दिनी प्रत्येकाच्या मूलभूत हक्कांचा सन्मान राखत एकत्रितपणे प्रागतिक वाटचाल करण्यास कटिबद्ध राहूया’, असे ते म्हणाले आहेत.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय हे मूलभूत अधिकार दिले आहेत. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक आहे. जागतिक मानवी हक्क दिनी प्रत्येकाच्या मूलभूत हक्कांचा सन्मान राखत एकत्रितपणे प्रागतिक वाटचाल करण्यास कटिबद्ध राहूया. pic.twitter.com/0tu8mpdx1X
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 10, 2021
दरम्यान, दरवर्षी १० डिसेंबरला जगभरात ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघ मानवाधिकार कार्यालयाच्या नेतृत्वात जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्र संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेने १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिस येथे स्वीकारले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने १९५० मध्ये १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून जाहीर केला.
महत्वाच्या बातम्या:
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दलही जागरूक राहणे महत्वाचे-अमोल कोल्हे
- बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
