नवी दिल्ली : ८ डिसें.रोजी तामिळनाडूमधील जंगलामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात देशाचे प्रथम संरक्षण दल प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत(Bipin Rawat)यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला.
Paid my last respects to Gen Bipin Rawat, his wife and other personnel of the Armed Forces. India will never forget their rich contribution. pic.twitter.com/LAq83VfoBf
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2021
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखालील विशेष समिती अपघाताची चौकशी करणार आहे. त्यात तीनही सैन्यदलांचे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या तज्ज्ञांनी गुरुवारी अपघातस्थळी जाऊन पाहणी केली. हेलिकॉप्टरच्या ब्लॅक बॉक्ससह दोन बॉक्स ताब्यात घेतले आहेत.
काल(९ डिसें.)रात्री रावत यांच्यासह इतरांचे मृतदेह दिल्लीत आणण्यात आले. तद्पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतरांनी आदरांजली वाहिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जनरल रावत, मधूलिका रावत, ब्रिगेडीयर एल एस लिद्दर, विवेककुमार यांच्या पार्थिवांची ओळख पटली असून इतरांच्या पार्थिवांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी कुटुंबियांची डीएनए टेस्ट करण्यात येत आहे. त्यानंतरच मृतदेहांना कुटूंबियांना सोपवून अंत्यसंस्कार होतील. आज(१० डिसें.) सकाळी ११ ते १२.३० च्या दरम्यान सर्वसामान्य लोक रावत दाम्पत्यांना श्रद्धांजली अर्पित करु शकतील. त्यानंतर दुपारी १२.३० ते १.३० ह्या वेळेत सैन्य अधिकारी श्रद्धांजली देण्यासाठी येतील. त्यानंतर दुपारी २ वाजता पार्थिवांना दिल्लीच्या कॅंट बराक चौकात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात येईल. तिथेच जनरल रावत यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
दरम्यान, या अपघातात १३ जणांना आपला जीव गमवावा लागला. ज्यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधूलिका रावत, लेफ्टनंट हरजिंदरसिंह, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंह, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, हवालदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंह, नाईक जितेंद्रकुमार, लान्स नाईक विवेककुमार, लान्स नाईक साई तेजा यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या:
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- भीमा कोरेगाव प्रकरणातील सुधा भारद्वाज यांना ‘या’ शर्तींसह जामीन मंजूर
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

