मुंबई: जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आजच्या दिनी मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, त्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.
मानवाधिकार हे वंश,लिंग,राष्ट्रीयत्व,भाषा, धर्म या कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी अंतर्भूत आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिप्राय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर हक्क समाविष्ट आहेत. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. असे ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.
मानवाधिकार हे वंश,लिंग,राष्ट्रीयत्व,भाषा, धर्म या कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी अंतर्भूत आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिप्राय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर हक्क समाविष्ट आहेत
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 10, 2021
दरम्यान आजच्या दिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही ट्वीट केले आहे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता व सामाजिक न्याय हे मूलभूत अधिकार दिले आहेत. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक आहे. जागतिक मानवी हक्क दिनी प्रत्येकाच्या मूलभूत हक्कांचा सन्मान राखत एकत्रितपणे प्रागतिक वाटचाल करण्यास कटिबद्ध राहूया. असे आवाहन करणारे ट्वीट शरद पवार यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’


