🕒 1 min read
नवी दिल्ली: पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालानंतर पाच पैकी चार राज्यांमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी बोलताना मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. भ्रष्टाचार करण्यात येणाऱ्या तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर मोदींनी निशाणा साधला आहे.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग असल्याचं म्हटलं आहे. देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे. भाजपाने २०१४ प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती. आमचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने २०१९ मध्ये आणखी आशीर्वाद दिला, असं मोदी म्हणाले.
आज हम देख रहे हैं जो निष्पक्ष संस्थाएं, भ्रष्टाचार के खिलाफ कार्रवाई करती हैं, ये लोग और उनका इकोसिस्टम, उन संस्थाओं को बदनाम करने के लिए मैदान में आ जाते हैं।
ये देश का दुर्भाग्य है कि घोटालों से घिरे लोग एकजुट होकर, अपने इकोसिस्टम की मदद से, इन संस्थाओं पर दबाव बनाने लगे हैं। pic.twitter.com/ecA9gLqnyS
— BJP (@BJP4India) March 10, 2022
पुढे बोलताना मोदी म्हणाले, टस्थ असलेल्या संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात तर हे लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत. तपास यंत्रणांना थांबण्यासाठी हे लोक नवीन मार्ग शोधत आहेत. या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही, असं मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“…त्या प्रेतांची पर्वा न करता लोकांनी पुन्हा भाजपला मतदान केले”, राऊतांचा घणाघात
-
“…तेव्हा निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते”, संजय राऊतांनी व्यक्त केला संशय
-
राजकारणात ५० वर्ष घालवूनही विरोधकांकडे कसलेही अनुभव नाहीत- चंद्रकांत पाटील
-
‘त्याने खोटे बोलत चाहत्यांचा विश्वासघात केला’ माजी पाकिस्तानी खेळाडूचा रमीझ राजांवर हल्ला
-
“पराभवापेक्षा विजय पचवणे कठीण; भाजपला या विजयाचे अजीर्ण होऊ नये”, शिवसेनेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
