Share

Bihar Political Crisis | मोठी बातमी! “BJP-JDU युती संपली” ; आमदारांच्या भेटीनंतर नितीश कुमारांची घोषणा

Published On: 

🕒 1 min read

पाटणा : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राजकीय वर्तुळात बिहारच्या राजकारणाची चर्चा सुरू होती. आता त्या सर्व गोष्टी पूर्णपणे स्पष्ट झाल्या आहेत. म्हणजेच आता बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची युती तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी सुरू असलेली जेडीयूची बैठक संपली आहे. बैठकीत भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नितीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे.

नितीश कुमार राजीनामा देणार-

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार आता राजीनामा देणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. नितीश कुमार आणि तेजस्वी दुपारी चारच्या सुमारास राजभवनात जाऊ शकतात.

 भाजपही पक्ष कार्यालयात कोअर ग्रुपसोबत बैठक-

या सगळ्यात बिहारमधील एनडीए आघाडीत बिघाड झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता भाजपही पक्ष कार्यालयात कोअर ग्रुपसोबत बैठक घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार सरकारमधील मंत्री शाहनवाज हुसैन सध्या दिल्लीत आहेत. दुपारी 3 वाजता ते दिल्लीहून पाटण्याला रवाना होतील. यानंतर सायंकाळी पाच वाजल्यापासून भाजपची बैठत होऊ शकते. दुसरीकडे, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव हेही बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळावर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मात्र, सध्या बिहारमध्ये जे काही सुरू आहे. ते थेट तेजस्वी यादव यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश यांच्या जेडीयूने पक्षाने 243 जागांपैकी 45 जागा जिंकल्या. तर भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्री बनवून राज्याची कमान त्यांच्याकडे सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 मध्ये राष्ट्रीय जनता दलाने 79 जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 19 जागा जिंकल्या. बिहारमध्ये बहुमताचा आकडा 122 आहे.

जेपी नड्डा यांच्या वक्तव्यामुळे नाराज-

बिहारमध्ये सत्ता वाचवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह, धर्मेंद्र प्रधान आणि जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सर्व प्रमुख नेते नितीश कुमार यांच्या संपर्कात होते जेणेकरून परिस्थितीवर मात करता येईल आणि युती वाचवता येईल. मात्र भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, सर्व प्रादेशिक पक्षांचा सफाया केला जाईल. यामुळे नितीश कुमार नाराज झाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!