Share

Nana patole | भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपद, यातून भाजपाचा खरा चेहरा दिसतो – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. आज पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला आहे. शिंदे गटातील आणि भाजपातील एकूण १८ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात एकाही ही अपक्ष आमदाराचा समावेश नाही. तसेच या मंत्रिमंडळात एकाही महिला आमदाराला स्थान देण्यात आलेलं नाही. अशा एक ना अनेक कारणांवरून विरोधक शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे.

“पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तशी मागणी भाजपानेच केली होती. त्याच संजय राठोड यांना भाजपाच्या या सरकारमध्ये पुन्हा मंत्री करण्यात आले. टीईटी घोटाळ्यात नाव आलेले आमदार अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले. म्हणजेच या सरकारमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना मानाचे स्थान दिले जात आहे. इतर पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, ईडी, सीबीआयकडून त्यांची चौकशी करायची. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून कारवाया करण्यास सांगायचे आणि आता स्वतःच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे, यातून भाजपाचा खरा चेहरा समोर येतो. तसेच या सरकारकडे नुकसानग्रस्त नागरिकांना मदत करायला पैसे नाहीत. पण मोंदींचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनसाठी 6 हजार कोटी रुपये आहेत “, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

अजित पवारांनीही केली टीका
उशिरा का होईना पण शपथविधी झाला, महाराष्ट्राला मंत्रिमंडळ मिळालं. सध्या राज्यात अनेक प्रश्न निर्माण झालेत, शेतकऱ्यांच्या-नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या आहेत. आता तरी सरकारने जनतेच्या अडचणी सोडवाव्यात. काही आमदारांबद्दल अजूनही बोललं जात आहे. काही प्रकरणांमध्ये काही लोकांना (आमदारांना) अजूनही क्लीनचीट मिळालेली नाही. अशांना पण मंत्रिमंडळात घेतलं आहे, त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!