टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच देशाला संबोधित करणार आहेत, आज संध्याकाळी आठ वाजता मोदी देशाला संबोधित करतील. पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबतचे ट्विट करण्यात आले आहे.
कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयानंतर नरेंद्र मोदी बुधवारी देशाला संबोधित करणार होते, मात्र माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे शोक पाळण्यात आला होता. केंद्र सरकारने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरचे 370 कलम बदलून जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख यांचे विभाजन करत केंद्रशासित प्रदेश बनविले आहेत.
Prime Minister Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM today.
— PMO India (@PMOIndia) August 8, 2019
आजवरच्या सर्वच निवडणुकांत काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर होता, मात्र आजवर कधीही पूर्ण बहुमत न मिळाल्याने हा प्रश्न प्रलंबित राहिला. २०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारने कलम ३७० रद्द करण्यास बहुमताने मंजुरी दिली आहे. राष्ट्रवादी रामनाथ कोविंद यांनी देखील विधेयकावर शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये बनलेली परिस्थिती, पाकिस्तानचा झालेला तिळपापड, विरोधकांकडून करण्यात येणारी टीका, यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमक काय बोलणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
जीवनात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करत होते, सुषमा स्वराज यांचे अखेरचं ट्विट
मोदींची तुलना शिवरायांशी…भाजपाच्या बौद्धिक दिवाळखोरीचं नवं लक्षण
पाकिस्तानची दाणादाण, भारताला घाबरून हवाई हद्द केली बंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

