टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानने भारताच्या निर्णयाचा निषेध केला असून भारतासाठी हवाई मार्ग बंद केला आहे. तसेच भारताच्या राजदूतांना जाण्यास सांगितले आहे. तर आपले देखील अधिकारी माघारी बोलावले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तडकाफडकी निर्णय घेत. इतर देशांना देखील हवाई मार्ग बदलण्याची नोटीस दिली आहे. तर काही विमानांना उंचीवरून उड्डाण करण्यास सांगितले आहे.
भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्ताच्या सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बालकोट एअर स्ट्राईक नंतर भारतासाठी हवाई मार्ग बंद करण्यात आला होता. मात्र तो कालांतराने खुला केला.
दरम्यान भारताने जम्मू काश्मीरचा प्रश्न निकाली काढला आहे. कलम 370 हटवून जम्मू काश्मीरचे विभाजन करून लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश घोषित केला आहे. तर जम्मू काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने विविध योजना आखल्या आहेत. याआधी जम्मू काश्मीर हे भारताचा अविभाज्य राज्य होते. ते कलम 370 ने जोडले होते.
चक्क मुख्यमंत्र्यांच्याच पत्नीला सायबर चोरांनी घातला लाखोंचा गंडा
कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग रखडवला !
#Article370 : ‘या’ कारणामुळे शरद पवार होते सभागृहात गैरहजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

