Share

जीवनात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करत होते, सुषमा स्वराज यांचे अखेरचं ट्विट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. मंगळवारी रात्री स्वराज यांना छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. स्वराज यांच्या जाण्याने संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.

सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी काही तास अगोदर केलेलं ट्विट सर्व देशवासियांना चटका लावणारे आहे. स्वातंत्र्यापासून जम्मू काश्मीरला कायम वेगळे दाखवणारे कलम ३७० हटवण्याच्या विधेयकावर मंगळवारी लोकसभेने शिक्कामोर्तब केले. या विधेयकाला लोकसभेने मंजुरी देताच सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत ट्विट केले होते.

‘मी जीवनात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करत होते’ असे भावनिक ट्विट स्वराज यांनी केले होते. त्यांच्या निधनानंतर हेच ट्विट व्हायरल झाले आहे.

सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार

सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. मंगळवारी मध्यरात्री त्यांचं पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आलं. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 3 पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

सुषमा स्वराज यांची दैदिप्यमान कारकीर्द

जन्म १४ फेब्रुवारी १९५२ हरयाणा राज्यातील अंबाला.

अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी

पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी

१९७३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली

१९७५ मध्ये स्वराज कौशल यांच्याशी विवाह

वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणाच्या आमदार आणि कॅबिनेट मंत्री

१९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड

१९९० मध्ये राज्यसभा सदस्य

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री

नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!