Share

‘आमचे सरकार तेव्हा पण शेतकाऱ्यांसोबत होते, आजही आहे’; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

Published On: 

नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. त्यात काल पासून अनेक दिग्गज खासदारांनी भाषण केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्ष, राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे.

आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसला (Congress) माय लेकाचा पक्ष म्हणून नामांतर करा असे सूचित केले. तसेच त्यांनी काँग्रेसने देशात कोरोना पसरवला आहे असा आरोप केला. काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे देशाचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे. काँग्रेसची बऱ्याच राज्यात अजून एकदाही सत्ता आली नाही. आमचा एखादा पराभव झाला तर आम्ही अनेक महीने त्यावर चिंतन करतो, परंतु काँग्रेस एवढ्या वेळा हरून सुद्धा त्यांचा अहंकार जात नाही, असे मोदी म्हणाले.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकाऱ्यांबाबत बोलताना म्हणाले, कोरोनाच्या (Corona) वैश्विक महामारी सारख्या काळात जेव्हा जगभरातील देशांची आर्थिक स्थिती बिघडली होती, तेव्हा आमच्या सरकारने एमएसपी (MSP) वर रेकॉर्ड खरेदी केली होती. भाजप सरकार त्या काळात सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी होते आणि आजही उभी आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!