Share

सुखद! ‘किसान रेल्वे’द्वारे विभागास मिळाला २८ कोटींचा महसूल

Published On: 

औरंगाबाद : कोरोनामुळे रेल्वेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र या कालावधीत किसान रेल्वेने आर्थिक बाजू सांभाळण्यात मोलाची भूमिका निभावली असून यंदा नांदेड रेल्वे विभागास जवळपास २८ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे रेल्वे विभागास मोठा दिलासा मिळताना दिसत आहे.

नांदेड रेल्वे विभागातील नगरसोलहून २०० वी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेऊन पश्चिम बंगाल येथील मालदा टाऊन येथे रवाना झाली. या वर्षी ५ जानेवारीला सुरू झालेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. फक्त १६३ दिवसांत २०० किसान रेल्वेेने नगरसोलहून देशाच्या विविध भागांत कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोहोचवण्यात आले. यातून नांदेड रेल्वे विभागास २८.३५ कोटींचा महसूल प्राप्त झाला.

२०० किसान रेल्वेमधून आजपर्यंत ६१ हजार ७४७ टन कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे. हा शेतमाल न्यू गुवाहाटी, नावगाचिया, डानकुनी, मालदा टाऊन, गौर मालदा, अागरतळा, फातुहा, न्यू जलपायगुडी आदी ठिकाणी पोहोचवण्यात आला. मालवाहतूक भाड्यात ५०% सवलतीचा इतर ठिकाणांवरील शेतकरी, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंघ यांनी केले.किसान रेल्वेचे वैशिष्ट्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार धावतात. साधारण ५० किती प्रतितास या वेगाने त्या धावतात व शेतमाल वेळेवर पोहोचतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!