सोलापूर : राज्य कामगार विमा योजनेचे (इएसआय) सदस्य कोरोना संसर्गावरील उपचार खासगी रुग्णालयांतूनही घेऊ शकतात. त्याच्या खर्चाचा दावा केल्यानंतर रक्कम परत मिळू शकते, अशी माहिती योजनेचे व्यवस्थापक शशीशेखर शिराळे यांनी दिली.
ते म्हणाले, देशात सध्या २१ रुग्णालये आहेत. त्यात ३ हजार ६७६ विलगीकरण बेड्स, २२९ अतिदक्षता विभागातील बेड्स, आणि १६३ व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेले बेड्स कार्यान्वित आहेत. राज्य सरकारच्या सहकार्याने एकूण २६ योजना राबवण्यात येतात. कार्यरत कर्मचारी, निवृत्तीधारकांना प्राधान्याने उपचार देण्यात येत आहे. त्यांच्यासाठी राखीव खाटा ठेवण्यात आल्यात.
हरियाणा आणि तेलंगणा येथील रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी करण्यात येत आहे. त्याशिवाय देशातील काही नामवंत रुग्णालयांशी इएसआयने करार केला. त्यांच्या सहकार्यानेही उपचार सुरू झाले. इएसआय योजनेच्या सदस्यांना कुठल्याही अडचणीं सामोरे जावे लागू नये, म्हणून सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.
इएसआय सदस्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी
१. कोरोनाच्या उपचारासाठी कामावर गैरहजर राहत असलेल्यांना रोजच्या वेतनाच्या ७० टक्केप्रमाणे ९१ दिवसांसाठी वेतनही दिले जाते.
२. विमाधारक बेरोजगार झाल्यास, अटल बिमा कल्याण कल्याण योजनेंतर्गत जास्तीत जास्त ९० दिवसांसाठी ५० टक्के वेतन मिळते.
३. जर विमाधारक आस्थापना बंद झाल्यामुळे बेरोजगार झाल्यास पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी बेरोजगार भत्ता मागू शकतो.
४. विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, अंत्यसंस्कार खर्चासाठी १५ हजार रुपये त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याला दिले जाते.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारचे मोठे पाऊल, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आयोगाच्याच वकिलाची टीका, पदाचाही दिला राजीनामा
- यांच काही वेगळच चाललंय, निवृत्ती स्विकारण्याच्या वयात कसोटी पदार्पण; पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पराक्रम
- ‘कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्याऐवजी २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा’ हवा कशाला ?’
- अभिनेत्री कंगनाला कोरोनाची लागण ; सोशल मिडियावरून स्वतः दिली माहिती


