औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी, महापालिकेने सुरु केलेल्या १९ कोविड केअर सेंटरपैकी सहा कोविड केअर सेंटरमध्ये सध्या ३५० रुग्ण उपचार घेत असून १३ कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण नसल्यामुळे ते सध्या बंद अवस्थेत आहेत. पालिकेच्या सर्व कोविड सेंटर्सची एकूण ३,९३८ रुग्णांची क्षमता आहे. मात्र शहरातील विविध कोविड सेंटर्समध्ये केवळ साडेतीनशे रुग्ण दाखल असल्याचे पालिकेने कळवले आहे. त्यामुळे एकुणच शहरात सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात भयावह स्थिती निर्माण झाली होती. दररोज हजार, दिड हजारांच्या घरात निघणारी रुग्णसंख्या, ऑक्सिजन, रेमडिसीवीर, व्हेंटिलेटर बेड्सचा तुटवडा यामुळे पुन्हा एकदा शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत होता. पहिल्या लाटेनंतर बंद झालेली कोविड सेंटर्स त्यात नव्याने भर टाकून १९ सेंटर्सचे दरवाजे पुन्हा उघडले गेले. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरु केल्या.
राज्य शासनानेही ब्रेक द चेन अंतर्गत पुकारलेल्या संचारबंदीचा देखील कोरोना प्रतिबंधासाठी उपयोग झाला. नागरिकांची स्वयंशिस्त, मास्कचा वापर, कडक निर्बंध, लसीकरण यामुळे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटण्यास सुरुवात झाली. सध्यस्थितीत शहरात १४२३ रुग्ण उपचार घेत आहेत. यात ३५० रुग्ण सहा कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार घेत आहेत. रुग्ण नसल्याने १३ कोविड सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.
अशी आहे रुग्ण संख्या
सिपेट कोविड सेंटर -१०२
एमआयटी – ११०
किलेअर्क समाजकल्याण- ४५
एमजीएम – १४
इओसी पद्मपुरा – २८
सीएसएमएसएस – ५१
महत्त्वाच्या बातम्या
- रस्त्यावर उतरण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडा; चव्हाणांचा मेटेंना टोला
- तिसर्या लाटेसाठी सर्व उपाययोजनांसह प्रशासनाने सज्ज राहावे, लोकप्रतिनिधींच्या सूचना!
- ‘सामंतांना माहितीये भाजपचं पुन्हा येणार, त्यामुळेच ते…’; निलेश राणेंच्या व्हिडीओने खळबळ
- पुणे : मंगेशकर रुग्णालयात सर्वसामान्यांना 900 रुपयात तर 200 डोस गरजूंना मोफत मिळणार
- शहर धूळमुक्त होण्यासाठी पालिकेच्या तीन स्विपिंग मशिन्स औरंगाबादकरांच्या सेवेत दाखल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

