औरंगाबाद : फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेड्सची कमतरता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेने होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. आता पालिकेने आणखी एक अभिनव उपक्रमास सुरुवात केली आहे. मुंबई येथील ओरेन्ट कन्सलटन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कॉल सेंटर सुरु केले आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधित व्यक्तींसह विविध आजार असलेल्या व्यक्ती, कोविड आणि पोस्ट कोविड रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी यात काम केले जात आहे.
या कॉल सेंटरच्या माध्यमातून दोन दिवसात होम आयसोलेशन आणि पोस्ट कोविडच्या अडीच हजार नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. कॉल सेंटरमधून विचारपूस करण्यासाठी फोन आल्यामुळे रुग्णांनाही दिलासाच मिळाला. पालिकेने हि सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या होम आयसोलेशनमध्ये असलेले रुग्ण, हायरिस्क व कोमॉर्बिडिटी असलेले नागरिक, साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, कोविड व कोविडपश्चात रुग्ण, कोरोना लसीच्या दुसर्या डोससाठीचे पात्र लाभार्थी या गटातील व्यक्तींना कॉल सेंटरमधून सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत फोनद्वारे संपर्क साधला जात आहे.
पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या कॉल सेंटरमधून दोन दिवसात ६४० होम आयसोलेशन, १७५० पोस्ट कोविड नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येकाच्या तब्येतीची विचारपूस केली. पोस्ट कोविड रुग्णांना थकवा जाणवत असल्याचे यातून समोर आले आहे. पोस्ट कोविड रुग्णांनी मात्र थकवा जाणवतो, असे सांगताच डॉक्टरांनी जास्त पाणी पित जा, लिंबू शरबत घ्या, तर काही जणांनी नाक वारंवार बंद असल्याची तक्रार करताच त्यांना तातडीने नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे सुचविण्यात आले. कॉल सेंटरमध्ये डॉ. सचिन हाके आणि डॉ. माधुरी गव्हाणे हे रुग्णांना वैद्यकीय सल्ला देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राची हास्यदिंडी थेट पोहोचली पारनेर नगरीतील कोविड सेंटरमध्ये
- ‘जनता ठरवेल शिवसेनेनं काम किती केलं आणि वसुली किती केली ते’
- कामगार संघटना व ऊर्जामंत्र्यांमध्ये मध्यस्थीसाठी, वीज कामगार संघटनांचे आ. भुमरेंना साकडे
- खुशखबर; ग्रामीण भागाचा रुग्ण आकडा शंभरीच्या आत
- आयुर्वेदाच्या मदतीने ६०० कोरोना रुग्ण झाले ठणठणीत बरे ; AIIA ने दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

