🕒 1 min read
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार डीन एल्गारने आपल्या सहकारी खेळाडूंना आगामी आयपीएल ऐवजी बांगलादेशविरुद्ध देशासाठी खेळा असा सल्ला दिला आहे. कारण ही त्यांच्या निष्ठेची परीक्षा असून त्यांनी देशाला प्रथम प्राधान्य द्यावे असे एल्गारला वाटते.
दक्षिण आफ्रिका १८ मार्चपासून बांगलादेशविरुद्ध तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. १८, २० आणि २३ मार्च रोजी वनडे सामने होणार आहेत. यानंतर ३१ मार्चपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार असून ती १२ एप्रिलला संपणार आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आयपीएल निवडायचे की बांगलादेशविरुद्ध खेळायचे हा निर्णय खेळाडूंवर सोडला आहे. “त्यातच कर्णधार एल्गार म्हणाला आहे की खेळाडूंनी त्यांना आयपीएल खेळायचे आहे की देशासाठी खेळायचे आहे हे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला सांगावे. ही खेळाडूंच्या निष्ठेची कसोटी आहे. कारण कसोटी व वनडे क्रिकेट खेळूनच ते आयपीएलपर्यंत पोहोचले आहेत, हे त्यांनी विसरू नये.
एल्गार म्हणाला मी प्रत्येक खेळाडूला संघातील त्याचे स्थान काय आहे सांगेन आणि प्रत्येक खेळाडूशी बोलेन. मी त्यांना सांगेल की ते कुठे आहेत आणि आम्ही एक संघ म्हणून कुठपर्यंत पोहोचलो आहोत.”
दक्षिण आफ्रिकेचे ११ क्रिकेटपटू आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळणार आहेत. यापैकी सहा कसोटी खेळाडू आहेत तर तीन वनडे खेळाडू आहेत. तर आयपीएल २६ मार्च पासून सुरु होईल.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
