🕒 1 min read
मुंबई: ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय समजले जाणारे राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला. यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. हे दिल्लीचं महाराष्ट्रावर आक्रमण आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. भाजपला महाविकास आघडीची भीती वाटतेय. त्यामुळेच निवडणुका आल्यानं छापेमारी सुरु असल्याचं आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे.
“महाराष्ट्रावर आधीदेखील आक्रमणं झालेली आहेत. हे दिल्लीचं आक्रमणंच आहे. आपण पाहत असाल, गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा निवडणूक लागेल असं कळालं आणि महाविकास आघाडीची भाजपला भिती वाटायला लागली, तेव्हापासूनच असं सुरु आहे. हे युपीमध्ये देखील केलेलं. हैद्राबादमध्येही केलंय. बंगालमध्येही केलेलं. आता महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या आहेत. म्हणून इथे सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही आणि महाराष्ट्र थांबणार नाही.” असं मंत्री आदित्य ठाकरे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
