🕒 1 min read
मुंबई: आज (८ मार्च) शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद होणार आहे. मात्र त्यापूर्वीच सेनेच्या नेत्यांवर मुंबईत आज केंद्रीय यंत्रणांकडून धाडसत्र टाकण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आता संजय राऊत यांनी पुन्हा नवे ट्वीट करत अजूनच आग भडकवली आहे.
“तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा, हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में…अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा..? आज चार वाजता, शिवसेना भवन”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
तुम्हें हम भी सताने पर उतर आएं तो क्या होगा
हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफ़िल में
अगर हम सच बताने पर उतर आएं तो क्या होगा..
आज 4 बजे
शिवसेना भवन pic.twitter.com/REvdDeBGED— Sanjay Raut (@rautsanjay61) March 8, 2022
दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड होणार आहे. इडीबाबद पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पुरावे पाठविले असून ही सर्व माहिती पत्रात आहे आणि टप्प्याटप्प्याने बाहेर येईल. आज त्यातला पहिला भाग मी बाहेर काढणार आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
