🕒 1 min read
मुंबई: मुंबईत सेनेच्या कार्यकर्त्यावर ईडीने कारवाई केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले शिवसेना नेते राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. यावरच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“शिवसेना वांद्रा बंगलोच्या जवळचे राहूल कनाल यांच्या घरी आयकर ची धाड पडली आहे. उद्धव ठाकरेजी घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागणार”, असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
Shivsena "Bandra Bunglow" ke karibi Rahul Kanal ke yahan Income Tax ki Raids.
Udhav Thackeray ji Ghotalo ka Hisab to Dena Padega
शिवसेना "वांद्रा बंगलो" चा जवळ चे राहूल कनाल चा घरी आयकर चा धाडी..
उद्धव ठाकरे जी घोटाळ्या चा हिशोब तर द्यावाच लागणार@BJP4India @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 8, 2022
दरम्यान राहूल कनाल यांच्यावर पडलेल्या ईडी धाडीमुळे ते एकदमच चर्चेत आले आहेत. तर भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांचा थेट दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी संबंध जोडला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण वेगळेच वळण घेतल्याचे दिसून येते आहे. दरम्यान राहुल कनाल युवासेनेचे पदाधिकारी असून शिर्डी देवस्थानाच्या विश्वस्तांपैकी ते एक आहेत. आयकर विभागाचे अधिकारी मंगळवारी (८ मार्च) सकाळी सीआरपीएफ जवानांची सुरक्षाव्यवस्था घेऊन त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याठिकाणी तपासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
