Share

IPL 2022: धोनीच्या ‘चेन्नई सुपर किंग्स’चे सुरत मध्ये भव्य स्वागत; चाहत्यांनी केली गर्दी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL च्या गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने सोमवारी सूरतमधील लालभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडियमवर आगामी हंगामासाठी त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे. चेन्नई सुपर किंग्सने यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, MS धोनी इतर स्टार्ससोबत त्यांच्या प्रशिक्षण सत्रासाठी स्टेडियममध्ये फिरताना दिसत आहे, ज्यामध्ये CSK खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते रस्त्यावर रांगेत उभे आहेत.

चेन्नईच्या ट्विटरवर हा व्हिडिओ टाकला गेलाय ज्याच्या खाली त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले “प्रेमाने भरलेले ते डोळे आम्हाला आनंद देतात, आम्ही कुठेही गेलो तरी!” सोबतच त्यांनी प्रशिक्षणाचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये कर्णधार धोनी (ms dhoni) , अंबाती रायुडू (ambati raydu), केएम आसिफ यासारखे खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत तर गोलंदाजी प्रशिक्षक एल बालाजी देखील फ्रँचायझीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रशिक्षणादरम्यान स्थळी दिसले.

IPL स्पर्धेची सुरुवात २६ मार्चपासून होणार आहे. पहिलाच सामना गतविजेता चेन्नई आणि कोलकाता यांचा होणार आहे. यंदाचे आयपीएल सामाने मुंबई आणि पुणे या दोनच शहरात खेळवण्यात येणार आहे. हेच लक्षात घेता मास्टरमाइंड धोनीने चेन्नईचे प्रशिक्षण केंद्र सुरतला बनवले आहे. यंदा स्पर्धेत गुजरातचाही संघ आहे. मात्र चेन्नईला सुरत मधूनही भरपूर प्रेम मिळताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!