🕒 1 min read
इंग्लंड : लॉर्ड्स कसोटी सामन्यात, टीम इंडियासाठी पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या केएल राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या कसोटी सामन्यात भारताचा 151 धावांचा विजय केएल राहुलने पहिल्या डावात 123 धावा केल्याच्या आधारावर बांधला गेला. राहुलने पहिल्या डावात जबरदस्त झुंज दाखवून हा डाव खेळला आणि टीम इंडियाने 364 चा आकडा गाठला. मात्र, दुसऱ्या डावात त्याला केवळ पाच धावा करता आल्या. त्याची खेळी खास होती आणि तो लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला.
दिलीप वेंगसरकर यांनी लॉर्ड्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये केएल राहुलच्या आधी 1979 साली सामनावीर विजेतेपद पटकावले. लॉर्ड्सवर कसोटीत भारतीय फलंदाज म्हणून हे विजेतेपद पटकावणारे ते पहिले खेळाडू होते. 41 वर्षांनंतर, एक फलंदाज म्हणून, आता केएल राहुलने लॉर्ड्सवर ही कामगिरी केली आहे.
दरम्यान, 1980 मध्ये कपिल देव यांनी या मैदानावर हा पराक्रम केला होता आणि त्यानंतर पुन्हा 1986 मध्ये कपिल देव यांनी दुसऱ्यांदा प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले. 1986 नंतर ईशांत शर्माने 2014 मध्ये लॉर्ड्सवर त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर प्लेअर ऑफ द मॅचचे विजेतेपद पटकावले. कपिल देव अष्टपैलू होते तर इशांत शर्मा गोलंदाज होता. लॉर्ड्सवर भारतीय फलंदाज म्हणून हा पराक्रम करणारा केएल राहुल दुसरा खेळाडू ठरला.
लॉर्ड्सच्या कसोटीत भारतासाठी प्लेअर ऑफ द मॅच जेतेपद पटकावणारे खेळाडू
दिलीप वेंगसरकर- (1979)
कपिल देव- (1980)
कपिल देव- (1986)
इशांत शर्मा- (2014)
केएल राहुल- (2021)
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- भारतीय हवाई दलाची कामगिरी : अफगाणिस्तानात अडकलेले १२० भारतीय आले मायदेशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
