Share

भारतीय हवाई दलाची कामगिरी : अफगाणिस्तानात अडकलेले १२० भारतीय आले मायदेशी

Published On: 

🕒 1 min read

काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. एकूणच अशा भयावह स्थितीमध्ये अफगाणिस्तानात विविध देशांमधील अडकलेले अधिकारी, कर्मचारी आणि विविध कामांसाठी गेलेले नागरिक हे सुरक्षित स्थळी परतण्यासाठी धडपड करत आहेत.

अफगाणिस्तानात भारतीय नागरिकांची संख्या देखील अधिक असून भारतीय हवाई दलाने त्या नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यास आता सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते. गुजरातच्या जामनगर विमानतळावर हे विमान उतरले.

आज भारतात परतलेल्या नागरिकांमध्ये भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकार यांचा समावेश आहे. अद्यापही तेथे अडकलेल्या नागरिकांचा आकडा हा अधिक असून भारतीय हवाई दल त्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. दरम्यान, आज परतलेल्या भारतीयांचे विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर या नागरिकांनी भारतीय हवाई दलाचे व सरकारचे आभार मानत भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!