मुंबई : ब्रिटन मध्ये नवा कोरोना विषाणू आल्याचे कळताच जगभरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचा दुसरा विषाणू आढळल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य शासनाने नाईट कर्फ्यु करण्याचा निर्णय घेतला. महापालिका क्षेत्रांमध्ये5 जानेवारीपर्यंत रात्री कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यामुळेच नववर्षाचं स्वागत जल्लोषात करायच्या तयारीत असलेल्या हौशींसाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिक कोरोनाच्या भयाला विसरले असले तरी संकट पूर्ण निवळलेलं नाही. त्यामुळे या वर्षात ज्याप्रमाणे सर्व धर्मियांनी सण-उत्सव साजरे केले त्याप्रमाणेच नववर्षाचं स्वागत देखील भान राखून संयमाने करावं अशी सूचना प्रशासनातर्फे करण्यात आली आहे आहे.
मार्गदर्शक सूचना –
1. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरला दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.
2. 31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील . तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
3. विशेषत: मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये देखील अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्या दृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.
5. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.
6. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात. अशावेळी त्या ठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.
7. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.
8. कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
9. तसेच 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. अशा सूचना गृह विभागामार्फत देण्यात आल्या आहे. नागरिकांनी यांचे पालन करावे, असे आवाहन गृह विभागामार्फत करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी महाबळेश्वरला जाण्याआधी विचार करा; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ आदेश
- ‘कंगनाच थोबाड फोडू हे सांगताना शिवसेनेला मर्दानगी आठवली नाही का?’
- ‘लालपरी’सह एसटीचा प्रवास होणार अधिक वेगवान!
- ग्रामपंचायत निवडणूक: राम शिंदेच्या चाैंडी गावात पुतण्यानेच थोपटले काकांच्या विरोधात दंड
- ‘मार्च’नंतर हे सरकार दिसणार नाही; राणेंनी सांगितला महाआघाडी सरकार कोसळण्याचा नवा मुहूर्त!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

