Share

‘रोहयो’तील कामांच्या लेबर बजेटची आखणी करा, जि. प. सीईओंना अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या सूचना

Published On: 

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर मी समृद्ध’ या विचारातून रोहयो कामांच्या लेबर बजेटची आखणी करण्याची सूचना राज्याचे मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बुधवारी दिल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत समृद्धी लेबर बजेट २०२२-२३ च्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त शंतनू गोयल, औरंगाबाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदवले, जालनाचे प्रताप सवडे, परभणीचे शिवानंद टाकसाळे, नांदेडच्या वर्षा ठाकूर, हिंगोलीचे आर.बी. शर्मा, लातूरचे अभिनव गोयल, बीडचे अजित कुंभार, उस्मानाबादचे राहुल गुप्ता, उप आयुक्त (रोहयो) समीक्षा चन्द्राकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो-औरंगाबाद) मंदार वैद्य, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पी.एस.शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र अहिरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी नंदकुमार यांनी, रोजगार हमी योजनेअंतर्गत अधिकचे काम देऊन दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून, या हेतूने गाव समृद्ध करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयांपर्यंत मिळायला हवा यासाठी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावपातळीवर नियोजन करावे. त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात यावी अशा सूचना केल्या.

गोयल यांनी, रोजगार हमी योजना शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी राबविण्यात येत असल्याचे सांगून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व अधिकारी यांनी पुढाकार घेण्याची सूचना केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!