औरंगाबाद : महाराष्ट्राचे सुपुत्र म्हणून आमच्या तुमच्याकडून खुप अपेक्षा आहे, पीयुष गोयलजी तुम है तो मुमकीन है असे आम्हाला वाटत होते, आमच्या अपेक्षा पुर्ण करा, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी साेमवारी संसदेत मराठवाड्याच्या रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला. मराठवाडा हा एक मागासलेला भाग आहे. या भागाला पुढे आणायचे असेल तर येथील रेल्वेचे जाळे विस्तार करणे खुप गरजेचे आहे. २५ वर्षांपासून आमच्या मागण्यांवर रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी एका ओळीच्या पत्राने पाणी फिरवतात. नफा – तोट्याचा निकष लावला तर आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची परंपरा कायम सुरू राहील असेही खासदार म्हणाले.
संसदेत रेल्वे अर्थसंकल्पावर सोमवारी बोलताना खासदार इम्तियाज जलील यांनी मराठवाड्यातील प्रश्नांकडे सातत्याने कसे दुर्लक्ष केले गेले याचा पाढा वाचून दाखवला. दक्षिण मध्य रेल्वे विभागात सर्वाधिक महसूल देणाऱ्या नांदेड विभागासाठी अर्थसंकल्पामध्ये फक्त ९८ कोटी रुपयांची तरतूद केल्याच्या मुद्याकडे इम्तियाज जलील यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले. जलील म्हणाले, सरकारने चांगला रेल्वे अर्थसंकल्प मांडला म्हणत स्वतःची पाठ थोपटवून घेतली. तरी मराठवाड्यात यावर काय प्रतिक्रिया उमटल्या तर मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांना रेल्वे अर्थसंकल्पातून ठेंगा दाखवून मराठवाड्याची घोर निराशा केली. कारण रेल्वे मंत्रालयाने मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी एकूण बजेटच्या दीड ते दोन टक्का एवढी तरतूद केलेली नसल्याचेही ते या वेळी म्हणाले.
दक्षिण मध्य रेल्वेतील नांदेड विभागासाठी ९८ कोटी ७५ लाख दोन हजार रुपये एवढ्या निधीची तरतूद केली आहे.
हा मराठवाड्यावर अन्याय आहे, परभणी – मनमाड रेल्वे दुहेरीकरणाची मागणी वर्षानुवर्षे होत आहे. औरंगाबाद – नगर रेल्वे मार्ग झाला तर औरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांची खुप चांगली सुविधा होणार आहे. औरंगाबादहून कोल्हापूर – धनबादला जाणाऱ्या रेल्वेमुळे छत्तीसगढ व इतर राज्याशी मराठवाडा जोडला जाणार होता, मात्र यातून देखील औरंगाबादसह जालन्याला वगळले. का तर रेल्वे बोर्डाला हा मार्ग अडचणीचा ठरला होता.
औरंगाबाद – चाळीसगाव या ८८ किलोमीटरची मागणी
औरंगाबाद – चाळीसगाव या केवळ ८८ किलोमीटर रेल्वे मार्गाची मागणी आम्ही करत आहोत. औरंगाबादेत डीएमआयसी, जालना येथे ड्रायपोर्ट आल्यामुळे रेल्वेला हा मार्ग आर्थिकदृष्ट्या देखील भारत सरकारला परवडणारा ठरू शकतो, पण तरी देखील या मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून निधीच दिला जात नाही. काही मार्गातून रेल्वेला फायदा होणार नाही, हे सांगून नियमीतपणे मराठवाड्यावर अन्याय केला, तर मागासलेला भाग कधी पुढे येणार ? मग तुमच्या सबका साथ सबका विकास घोषणेचे काय ? असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी केला. हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मराठवाड्यामधील सर्व खासदारांचे त्यांना समर्थन देखील मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
