Share

‘पोलिसांच्या गर्दीमध्ये डुकरं स्वतःला वाघ समजू लागले, पोलिसांना बाजूला करा मग बघू’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवेसना भवन समोर झालेल्या वादापासून सुरू झालेला भाजप आणि शिवसेनेतील वाद अद्याप क्षमलेला नाही. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला. सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते पुन्हा समोरा-समोर आले. यावर आता नीलेश राणे यांनी शिवसेना आणि आमदार वैभव नाईक या दोघांवर जहरी टीका केलीय.

या संदर्भात नीलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेना आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘उधारी मागायला आलेल्या शिवसेना आमदार वैभव नाईक याला आमच्या सहकाऱ्यांनी पळवून लावले. पोलिसांच्या गर्दीमध्ये डुकरं स्वतःला वाघ समजू लागले. एक दिवस पोलिसांना बाजूला करा मग बघू या… आणि उधारी हवी असेल तर अर्ज घेऊन ऑफिसला ये.’

शिवसेना भवनासमोर आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी भाजप कार्यकर्त्यांना चोप दिला होता. तेव्हापासून सेना आणि भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यात आला सिंधुदुर्गामध्ये त्या घटनेची पुनरावृत्ती होणार होती. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. मात्र, त्यावरुन नीलेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!