Share

“…त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”, संजय राऊतांचा इशारा

Published On: 

नवी-दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर नवी-दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray) एक दिवस विदेशात जायचं असेल तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कोणावर भरोसाचच नाही, ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे चार्ज द्या, असा खोचक सल्ला दिला होता. यावर प्रत्युत्तर देत राऊत म्हणाले की,’तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री देखील सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाचं काम करावं.’

दरम्यान, पुढे राऊत म्हणाले की,’जया बच्चन यांच्या सुनबाई आणि मुलासंदर्भात ऐकलं, जे सरकारविरोधात बोलतील, वागतील त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना ईडी, सीबीआयच्या समोर उभा करणं हे सूत्र झालं आहे. २०२४ पर्यंत हे चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल’, असा इशारा राऊत यांनी दिला. तसेच केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, यासंदर्भात विचारण्यात आले असता राऊत म्हणाले की, लखीमपूर खेरी प्रकरणी संबंधित व्यक्तीला तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशात सत्ता बदल होईल आणि देशातही २०२४ ला सत्ता परिवर्तन होईल असं वातावरण आहे. सरकारला शेतकऱ्यांसमोर शरणागती पत्करावी लागली’, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!