मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु होत असून २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. तसेच हे अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते परंतु यंदा ते मुंबईत होणार आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी आज लोकप्रतिनिधींना लघुपट दाखवणार असल्याची माहिती दिली आहे.
यासंदर्भात सुभाष देसाई यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आज लोकप्रतिनिधींना दाखविण्यात येणार आहे.’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'शांतता मराठीचं कोर्ट चालू आहे', हा लघुपट आज लोकप्रतिनिधींना दाखविण्यात येणार आहे. pic.twitter.com/Pgtc9fLncF
— Subhash Desai (@Subhash_Desai) December 22, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन दिवस हा लघुपट दाखविण्यात आला होता. याचवेळी पत्र मोहीम राबविण्यात आली. साडेदहा हजार पत्रे राष्ट्रपतींना पाठविण्यात आली. आपली मराठी अभिजात कशी आहे, याची सर्वांना कल्पना यावी, यासाठी हा लघुपट तयार करण्यात आला आहे.’ तसेच विधीमंडळातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व आमदार यांना हा लघुपट दाखविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
- “अमित शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत”
- ‘शिवसेनेला पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा’
- चिंताजनक! ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावाने इस्त्रायलमध्ये पहिला मृत्यू
- “एकच गुन्हा महाविकास आघाडी सरकार पुन्हा…”, भातखळकरांचे टीकास्त्र


