Share

“महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे”

Published On: 

मुंबई : आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra winter session 2021) सुरु झाले आहे. या अधिवेशनात जवळपास २६ विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. आज ठाकरे सरकारमधील विधानसभा अध्यक्षाचीही निवड केली जाणार आहे. विरोधक विविध प्रश्नांवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले, काम रोखणारे व रोखीने व्यवहार करणारे हे ‘रोखशाहीचे’ सरकार आहे. हे सरकार अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत व पीकविमा देऊ शकले नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या वीज पंपाचे कनेक्शन कापले गेले, एसटी आंदोलन नीट हाताळता आले नाही, भरती परीक्षांचा गोंधळ या सर्व पातळीवर सरकार अपयशी ठरले आहे. अशी टीका प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरला होते यंदा मात्र ते मुंबईत होणार आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून तुम्ही महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास ठराव आणाच, असं चॅलेंज केलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजण्याचे चिन्हे दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!