Share

“महिला अत्याचारांचा वाढलेला आलेख ‘मविआ’ सरकारला विनाशाकडे घेऊन जाणारा”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरात चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार केल्याची घटना १७ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन सातपूर पोलीस ठाण्यात आरोपीवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेवर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, “नाशिकची घटना… एका नराधमाने चिमुरडीच्या गळ्यावर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत तिच्या आईवर अनेकदा बलात्कार केला. पीडित महिलेनं मोठ्या हिमतीने पोलिस स्टेशन गाठलं त्यामुळे आरोपीला पकडता आलं. राज्यात महिला अत्याचारांचा वाढत चाललेला आलेख #MVA सरकारला विनाशाकडे घेऊन जाणारा आहे. केवढे हे क्रौर्य… चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले! महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर कलम कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.”

आरोपीने पीडितेवर नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील एका लॉजिंग हॉटेलमध्ये १७ डिसेंबर रोजी रात्रभर बलात्कार केला. पीडितेने नकार दिल्यास तो तिच्या लहान मुलीच्या नरडीवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत होता. असे तक्रारीत नमुद आहे. संशयीत आरोपी आझाद शेख असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने गुन्हा केल्यानंतर धूम ठोकण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल होताच सातपूर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!