बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोजच आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांना आपण पाहत असतो. त्याच प्रमाणे त्यांचे कार्यकर्त्ये देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकदा वाद-विवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावरच्या राजकीय कार्यकर्त्यांची टीकेची पातळी दिवसेंदिवस तळाला चालली असल्याचे पाहायला मिळत आहे.
राजकीय मतभेदामुळे होणारी वादावादी अनेकदा अंगलट आलेल्याच्या सध्या घटना समोर येत असतात. आज महाविकास आघाडीतील नेत्यांविषयी बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या दोघा जणांवर बारामतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा दोघांवर आरोप आहे.
केशव कुंथलगिरीकर आणि भानू बोराडे या दोन फेसबुक अकाऊण्ट धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव कुंथलगिरीकर यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो मॉर्फ करुन त्यांची बदनामी करणारा मजकूर लिहिला होता. तर भानू बोराडे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो मॉर्फ करुन मानहानीकारक पोस्ट लिहिल्याचा आरोप आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात नितीन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती सोबतचे फोटो आक्षेपार्हपणे एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. चित्रा वाघ यांच्या पती ऐवजी संजय राठोड यांचा चेहरा लावून फोटो मॉर्फिंग करण्यात आले होते. चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर संबंधित आरोपीला शोधून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- ‘वापराविना पडलेले व्हेंटिलेटर मोफत उपचार करणाऱ्या सेंटरला द्या’, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- मराठा आरक्षणासाठी आक्रोश मोर्चाला बीडपासून सुरुवात
- म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू


