औरंगाबाद : न्या. गायकवाड आयोगाने सर्वेक्षण करून मराठा समाजाचा मागास प्रवर्गात समावेश केला होता. त्यानंतर राज्य सरकारने आरक्षणही लागू केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले. यामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. गरीब, भूमिहीन, कष्टकरी, अल्पभूधारक मराठा विद्यार्थी व त्यांचे कुटुंब हलाखीचे जीवन जगत आहेत.
त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा ५ जून रोजी बीड येथून मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
सारथी संस्था, फी प्रतिपूर्ती, जिल्हा वसतिगृह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आदी योजनांकडेही सरकार कानाडोळा करत आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ५ जून रोजी बीड येथून पहिला मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्यात औरंगाबादेतून शेकडो कार्यकर्ते सहभागी होतील, असा इशारा शिवसंग्रामचे शहराध्यक्ष उमाकांत माकणे, कार्याध्यक्ष सलीम पटेल, मराठवाडा विद्यार्थी अध्यक्ष सचिन मिसाळ पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भनगुरे, गुड्डू बिल्डर, महेश जोगदंड, उत्कर्ष चव्हाण, वरद जागेस आदींनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- म्यूकरमायकोसिसचे औषधे अल्पदरात द्या; खंडपीठाचे राज्य सरकारला निर्देश
- गेवराईत नियमांचे उल्लंघन करणारे चार दुकाने सील
- सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू
- रात्रीस खेळ चाले! परतूरमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा
- अखेर आन्वा प्रशासनाला आली जाग; पाच दिवसांचा जनता कर्फ्यू लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

