Share

‘वापराविना पडलेले व्हेंटिलेटर मोफत उपचार करणाऱ्या सेंटरला द्या’, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन

Published On: 

औरंगाबाद : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गोरगरीब जनता बेहाल आहेत. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. अशा भयवाह परिस्थितीत शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन अभावी शेकडो व्हेंटिलेटर वापराविना पडून आहेत, असे व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या कोविड हॉस्पिटल सेंटर अथवा खाजगी रुग्णालयांना द्यावेत अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी नुकतीच केली आहे.

व्हेंटिलेटरसाठी लागणारा ऑक्सिजन व अन्य यंत्रणाचा अभाव असल्याने अनेक शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर पडून आहेत काही रुग्णालयात ऑक्सीजन सुविधा आहे. मात्र व्हेंटिलेटर चालवणारे तज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ नसल्याने या पार्श्वभूमीवर हे व्हेंटिलेटर कोरोना आजारावर मोफत उपचार करणाऱ्या कोविड सेंटरला अथवा हॉस्पिटलला दिल्यास बिघडले कुठे असा प्रश्न उपस्थित करून या कोरोनाच्या महामारीत शेकडो रुग्णांचे यामुळे प्राण वाचत आहे असेही आमदार बंब यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

व्हेंटिलेटर मिळणारे खाजगी कोविड सेंटर हे रुग्णांना कोणतेही बिल आकारत नाही जर त्यांनी बिल आकारण्यात आले तर शासनाला त्यांच्याकडून वसुली करता येईल. मात्र सद्यस्थितीत रुग्णांना व्हेंटिलेटरची अत्यावश्यकता असताना दुसरीकडे वापराविना ते पडून असल्याचे चित्र वेदनादायी व रुग्णांच्या जीवाशी खेळणारे आहे. ज्या सरकारी रुग्णालयाकडे व्हेंटिलेटर वापरासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध नाहीत त्यांना त्या पूर्ण करवण्यासाठी अवधी द्यावा तोपर्यंत हे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालय व कोविड सेंटरला वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी आमदार बंब यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!