Share

सावधान! रक्त तपासणीच्या नावाखाली कोरोना रुग्णांची लूट सुरू

Published On: 

बीड: कोरोना या महासंकटाने सर्वांनाच पछाडले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तर पहिल्या लाटेपेक्षा जास्त थैमान घातले आहे. अशा वेळेस मदतीला धाऊन येते ती म्हणजे आरोग्य व्यवस्था. पण जर तीच धोका देत असेल तर? गोर गरीब रुग्णांची आर्थिक लूट करत असतील तर? असाच प्रकार घडलाय जिल्ह्यातील लोखंडी सावरगाव इथल्या कोविड रुग्णालयात. खासगी रक्त तपासणी लॅबचालकांनी दलालांच्या माध्यमातून गोरगरीब कोरोना रुग्णांची दिशाभूल करत आर्थिक लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लोखंडी सावरगावच्या कोविड रुग्णालयात गरीब रुग्णांची होणारी आर्थिक फसवणूक होणारा हा गैरप्रकार जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी उघडकीस आणला आहे. या रॅकेटमध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी सामील असल्याचे आढळून आल्यानंतर अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी त्यास निलंबित केले असून एका खासगी लॅबच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील नागनाथ पांचाळ आणि त्यांचे कुटुंबीय कोरोना बाधित असल्याने त्यांच्यावर लोखंडीच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. या वेळी तिथे नंदकिशोर पांचाळ या रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याने त्यांना रक्त तपासणी अत्यंत आवश्यक असून त्यासाठी दोन व्यक्तीसाठी साडेसहा हजार रुपये लागतील असे सांगितले.

आधीच कोरोनामुळे घाबरलेल्या नागनाथ पांचाळ यांनी तयारी दर्शविल्यानंतर नंदकिशोर पांचाळने खाजगी लॅबच्या माणसाला बोलावून घेत तपासणीसाठी रक्त दिले. याबाबत नागनाथ यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर बर्दापूर जि.प. सर्कलचे सदस्य अविनाश मोरे यांनी लॅब चालकास चांगलेच फैलावर घेतले आणि नंतर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण यांना याबाबत कळविले.

गोरगरीब रुग्णांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यांना लुबाडणारे खासगी लॅबचालकांचे रॅकेट सर्व कोविड सेंटरमधून सक्रिय आहे. भोळेभाबडे गरीब रुग्ण हेरून खासगी रुग्णालयातून अव्वाच्या सव्वा दराने चाचण्या करण्यास भाग पाडतात. या रॅकेटची पाळेमुळे शोधून दलाल आणि सूत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य अविनाश मोरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!