नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. अशातच कोरोनाची लस कधी येणार यावर सर्व जगाचे लक्ष लागले आहे. ब्रिटनने गेल्या काही दिवसांपूर्वी फायझर व बायोएनटेकच्या लसीला वापरासाठी परवानगी दिली आहे. काेराेनाविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यामध्ये संपूर्ण जगाचे लक्ष फायझर-बायाेएनटेकने विकसित केलेल्या लसीकडे लागले आहे.
एका वृत्ताने दिलेल्या माहिती नुसार, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बाेल्साेनाराे यांनी या लसीवर अविश्वास दाखवला आहे. बाेल्साेनाराे म्हणाले, ‘लसीच्या दुष्परिणामांमुळे स्त्रियांना दाढी येऊ शकते किंवा तुम्ही मगरही हाेऊ शकता, असा विचित्र दावा त्यांनी केला आहे. बाेल्साेनाराे यांनी लसीबाबत चिंता व्यक्त करताना कंपनीने काेणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याचे स्मरण करून दिले आहे.’
काेणत्याही प्रकारच्या दुष्परिणामांसाठी कंपनी जबाबदार नसल्याचे फायझरच्या कंत्राटात लिहिल्याचे बाेल्साेनाराे म्हणाले. त्यामुळे तुम्ही मगरीमध्ये रूपांतरित झालात तर ती तुमची समस्या आहे. तुम्ही सुपर ह्यूमन बनले, महिलांना दाढी आली किंवा वेगळ्या आवाजात बाेलायला सुरुवात केली तरीही कंपनीला काहीही घेणे-देणे राहणार नाही, असे बाेल्साेनाराे यांनी म्हटलं आहे. त्यांनी स्वत: ही लस टाेचून घेण्यास नकार दिला आहे. लसीबाबत दिलासादायक वृत्त असले तरी त्यांच्या या दाव्यानंतर सगळीकडे भीती निर्माण झाली आहे. त्यांच्या या अजब दाव्याने महिलांमध्ये जास्त भीती वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध; काय आहे नेमकं कारण?
- पश्चिम बंगालमध्येही चालणार पवार पॉवर? ममतादीदींच्या मदतीसाठी शरद पवार जाणार धावून?
- Breaking: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरेंनी उचललं महत्वाचं पाऊल
- संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण
- ‘मोदींच्या विरोधकांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन हे आंदोलन कमी व जत्रा जास्त झाली आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

