Share

Breaking: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरेंनी उचललं महत्वाचं पाऊल

Published On: 

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही धोका मात्र कायम आहे. दिवाळीनंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. अस असली तरीही पुन्हा संसर्ग वाढण्याचा धोका आहेच.

अशातच, ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा आणि आधीच्या तुलनेत अधिक धोकादायक स्ट्रेन आढळून आल्यानं केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ब्रिटनहून भारतात येणारी हवाई वाहतूक रोखण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २२ डिसेंबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल. हा निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल.

दिल्लीपाठोपाठ मुंबई हे भारतातील महत्वाचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने महाराष्ट्राला देखील धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये महाराष्ट्राला असलेला संभाव्य धोका वेळीच टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्वाचं पाऊल उचललं आहे.

‘ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील.’

त्याचबरोबर, ‘संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!