🕒 1 min read
औरंगाबाद : चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेराहून दीड लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरीक छळ करण्यात आला. ही घटना १९ एप्रिल ते ८ नोव्हेंबर २०१८ याकाळात जयसिंगपुरा भागात घडली. याप्रकरणी आमेर खान नासेर खान, युनूस खान युसूफ खान, अब्दुल गणी, अब्दुल कासीम अन्य दोन महिला यांच्याविरुध्द बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत घराचे हप्ते फेडण्यासाठी माहेराहून पैसे आण अशी मागणी करत विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार ७ जुलै २०२० ते १३ जानेवारी २०२१ याकाळात छावणी भागात घडला. विवाहितेला घराचे हप्ते फेडण्यासाठी वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणत पती उमेश धर्मा पवार, सासरा धर्मा पुंडलिक पवार, दीप गौरव धर्मा पवार, सासू, ननंद आणि नंदोई चेतन सोनवणे यांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यावरुन छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत विवाहितेला नांदविण्यासाठी पाच लाखांची मागणी केलेल्या सासरच्या तिघांविरुध्द हुंडाबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबर २०१५ ते ६ जून २०१७ याकाळात जिन्सी भागात घडला. मोहम्मद शहेबाज उर्फ अदनान मोहम्मद मुस्ताक, महिला व मोहम्मद गजन यांनी विवाहितेला तुला माहेरच्या मंडळींनी काही एक काम शिकविले नाही. तुला नांदायला यायचे असेल तर माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणत विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केला. त्यावरुन जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले


